*'शरद नगर' ने विश्वास*
*आणि प्रेम कमावलं*
*"घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती*
*तिथे असावा प्रेम जीव्हाळा , नकोत नुसती नाती."*
वयात आलेल्या प्रत्येकाचचं एक स्वप्न असतं की, *' छोटसं का होईना पण स्वतःचं एक सुंदर घर असावं. घराला फक्त भिंती नकोत तर तिथे प्रेम, जीव्हाळा असावा,'* मात्र सध्याच्या फसवा-फसवीच्या जमाण्यात विश्वास कुणावर ठेवावा ? आपल्या कष्टाचे पैसे कुणी लुबाडले तर ? पोलीसांकडे कसे जाणार ? न्यायालयामधे दाद कोण मागणार ? तिथे तर श्रीमंतानाच न्याय मिळतो. बिल्डरच्याच बाजुने निकाल लागतो. म्हणूनच कुठलेही झंझट मागे न लागता आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता जर घर घ्यायचेच असेल तर मग 'शरद नगर' मधेच जा, असा सल्ला सर्रास दिला जातो, यामागचे प्रमुख कारण म्हणजे, गेल्या २५ वर्षामधे आम्ही आमच्या ग्राहकांचा कमावलेला विश्वास.
व्यवहारामधे प्रचंड पारदर्शकता असल्याने आणि संपूर्ण व्यवहार 'व्हाईट' मधेच केल्याने आजपर्यंत कुणाचीही फसवणूक झालेली नाही. ती कधीही होणार नाही. आम्ही कधीही ब्लॅकचे पैसे स्वीकारलेले नाहीत. आम्ही ज्या दिवशी कन्स्ट्रक्शन व्यवसायामधे उतरलो, त्याच दिवशी ठरवलं होतं की, *' माझा एक जरी ग्राहक बोलला की शरद पाटील यांनी मला फसवलं, त्याच दिवशी मी माझा व्यवसाय बंद करेन.'* या आशयाचा मजकुर मी माझ्या शरद नगरच्या प्रसिद्धी पत्रकामधेही वारंवारं प्रकाशित केला आहे.
गेल्या २५ वर्षात शेकडो ग्राहकांना फ्लॅट विकले मात्र आज पर्यंत आमचा एकही ग्राहक आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यामधे साधी तक्रारही करायला गेलेला नाही. कोर्टात जायची तर वेळ कुणावर कधीच आली नाही. माझ्याकडूनही कधी कुणाला नोटीस गेली नाही की, व्यवहारावरून कधी कुणाशी वाद झालेला नाही. व्यवहाराच्या सुरुवातीलाच जे काही असेल तर खरं - खरं सांगीतलं जातं. कुठलीही लपवा-छपवी न करता स्पष्टपणे ग्राहकांशी बोललं जातं. जे बोलतो ते फाईलवर लिहून दिलं जातं. दिलेला प्रत्येक शब्द कटाक्षाने पाळला जातो.
*'आम्ही शब्द देतो - आम्ही शब्द पाळतो '* हे आमच्या व्यवसायाचे ब्रिदवाक्य आहे. आजपर्यंत कधीही दिलेला शब्द टाळला नाही. ती वेळच कधी आली नाही. प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या जाहिरातींमधूनच आमचे दर जाहीर करतो. ज्या ॲमीनीटीज देणार आहोत त्यांचाही स्पष्ट उल्लेख करतो. बुकिंग करतानाच आम्ही दोन एक सारख्या फाईल बनवतो. एक फाईल ग्राहकाला देतो व दुसरी आमच्याकडे ठेवतो. सर्वकाही पारदर्शक व साफ - साफ लिहिलेलं. त्यामुळे कुणाची फसवणूक होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच ग्राहकांचा विश्वास आम्ही कमावला आहे. नुसता विश्वासच नाही तर प्रेमही मिळवलं आहे, हे आम्ही अभिमानाने सांगतो.
मोठ्या कष्टाने, पै - पै जमवून मनासारखं घर घेतलं मात्र तिथे फक्त भिंतीच असतील तर तिथे राहायला कंटाळवानं होतं. मग रडत - खडत जगणं सुरू होतं. त्या घरामधे प्रेम हवे, जीव्हाळा नांदावा. नात्यांमधून ओळावा झिरपावा. नुसती नाती असून चालत नाही तर ती नाती जीवापाड जपणारी, एकमेकांना सांभाळणारी, सुख-दुःखामधे सहभागी होणारी माणसं जवळ असावी लागतात. शरद नगर मधे नेमकं तेच निर्माण करण्याचे स्वप्न आम्ही पाहिलं आणि ते स्वप्न या नगरामधे राहणाऱ्या सर्व रहिवाशी मंडळींनी पूर्ण केलं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, *" शरद नगर उभारताना पैसा कमावलाच पण त्याबरोबर प्रेम आणि विश्वास ही कमावला."*
'शरद नगर' च्या सुरुवातीपासुन मी या नगरामधे राहणाऱ्या प्रत्येक महिलेला दरवर्षी न चुकता दिवाळीमधे 'भाऊबीज' करतो. तर रक्षाबंधनला नगरातील महिला मला राखी बांधतात. बिल्डर आणि रहिवाशी मंडळी यांच्यामधील हे नातं फारसं कुठे पाहायला मिळत नाही ते 'शरद नगर' मधे पाहायला मिळतं. या नगरामधे ज्यांनी - ज्यांनी फ्लॅट घेतले ते सर्वजण चांगल्या प्रकारे नगरामधे वर्तन करतात. एकमेकांशी सौजन्याने वागतात. गुण्या - गोविंदाने राहतात. त्यामुळे शरद नगर मधील रहिवाशी हे खऱ्या अर्थाने शरद नगरच्या नावलौकिकामधे नेहमीच भर घालत आहेत.
कायम स्वरूपी वास्तव्य करण्यासाठी प्रतिष्ठीत व चांगल्या स्वभावाची, विचारी माणसं शरद नगरचीच निवड करतात. येथे ते शांततेने राहतात. आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगतात. आपल्या गावापासून व कुटुंबीयांपासून दूर असलेल्या या रहिवासी मंडळींना 'शरद नगर' हे आपलचं गाव आहे व नगरातील रहिवाशी माणसं ही आपलेच नातेवाईक आहेत, असे सातत्याने वाटतं, हेच 'शरद नगर' उभारण्यामागच खरं यश आहे.
*• शरद यशवंत पाटील (बिल्डर)*
*शरद नगर, ऐनशेत रोड,*
*व्हाया आगर आळी, वाडा,*
*ता. वाडा, जि. पालघर.*
*(WP) 8600001111*
ब्लॉग
शरद नगरने प्रेम आणि विश्वास कमावला
