आमच्याबद्दल

एक आदर्श नगर

शरद नगर

Sharad Nagar
शरद नगर, वाडा

एक आदर्श नगर

वाडा शहरातील सर्वांगसुंदर नगर व प्रतिष्ठीत लोकांची वस्ती असा नावलौकीक मिळवलेले 'शरद नगर' हे सर्व सोयी - सुविधांनी सुसज्ज असलेले नगर आहे.

या नगरामधे ७ बिल्डींग बांधून पूर्ण झालेल्या आहेत. तिन बिल्डींगचे काम लवकरच सुरू होत आहे. या नगरामधील १७० फ्लॅट मधे सुमारे ७०० रहिवाशी रहात आहेत.

वाडा शहरापासुन ९ किमी अंतरावर असलेल्या पिक, ता. वाडा या गावचे रहिवासी असलेले शरद यशवंत पाटील हे या नगराचे संस्थापक आहेत. दि. १ जानेवारी २०११ रोजी त्यांनी शरद नगरच्या उभारणीस सुरुवात केली होती.

ऐनशेत रोड, वाडा येथील मोकळ्या माळरानावर 'शरद नगर' वसले आहे. शहराच्या बाहेर तरीही शहरातच आहे पण शहरातील गर्दीपासून जरा लांब, मोकळ्या व प्रदूषणमुक्त वातावरणामधे सर्व रहिवासी आनंदाने व गुण्या - गोविंदाने रहात आहेत.

अल्पावधीतच 'शरद नगर' ने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शून्यातून स्वतःचे विश्व कसे निर्माण होते ? याचे 'शरद नगर' हे उत्तम उदाहरण आहे.

Sharad Yashwant Patil
संस्थापक

शरद यशवंत पाटील

शरद नगर, वाडा चे संस्थापक

पालघर जिल्ह्यातील नामवंत लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्री. शरद यशवंत पाटील (रा. मशाल हाऊस, यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स, यशवंत नगर, वाडा) यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच पत्रकारीतेबरोबरच व्यवसायामध्ये पदार्पण केले. विविध प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय करत, अनुभव घेत त्यांनी २००१ मध्ये वाडा शहरात बिल्डींग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय खूप मोठा झाला असून जिल्ह्यातील प्रसिद्ध व विश्वासार्ह बिल्डरांमध्ये त्यांची गणना होते.

प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय नावारूपाला आणल्यानंतर यशवंत नगरच्या निर्मितीस सुरुवात केली. वाडा शहराबाहेर परळी नाक्यावर यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स ही सुंदर बिल्डींग बांधून यशवंत नगरची सुरुवात केल्यानंतर, बऱ्यापैकी यश आल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये वाडा शहरातील ऐनशेत रोडवरील मोकळ्या माळरानावर शरद नगरच्या निर्मितीस सुरुवात केली.

शरद नगर हे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्व सोयींनी सुसज्ज असलेले सर्वांग सुंदर नगर उभे राहावे, यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. आज वाडा शहरातील सर्वात प्रतिष्ठित नगर म्हणून शरद नगर ओळखले जाते. हे स्वप्न कसे पूर्ण केले ते शरद नगर – एक स्वप्न या पुस्तकात वाचायला मिळते.

याच शरद नगरमध्ये स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्स (१४७ फ्लॅट) हा गृहप्रकल्प उभा राहत आहे. मयुरेश्वर निवास (२० फ्लॅट) चा ताबा ग्राहकांना दिला असून सर्व रहिवासी आनंदाने व एकोप्याने राहत आहेत. सिद्धेश्वर अपार्टमेंट (२० फ्लॅट) चे बांधकाम पूर्ण झाले आहे तर एसपी हाईट्स (३५ फ्लॅट) चे काम सुरू आहे. लवकरच एसपी क्राऊनएसपी प्राईम (३६ फ्लॅट प्रत्येकी) चे काम सुरू होणार आहे.

याआधी राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, साईश्रद्धा अपार्टमेंट, सुशांतराणी रेसिडेन्सी, चिरागलक्ष्मी सदन व निलक्षता निवास अशा एकूण ५ बिल्डींगमधील १४५ फ्लॅटचा ताबा सन २०२० मध्येच दिला आहे. सुमारे ७०० पेक्षा जास्त रहिवासी या नगरात राहत असून नव्या बिल्डींगची बुकिंग सुरू आहे.

या नगराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे कुणाचीही कधीही फसवणूक झालेली नाही. «आम्ही शब्द देतो… आम्ही शब्द पाळतो» या ब्रीदवाक्याचे बिल्डर शरद पाटील यांनी तंतोतंत पालन केले आहे.

शरद नगरचे संस्थापक श्री. शरद यशवंत पाटील हे वाडा तालुक्यातील कायमचे रहिवासी असून त्यांचे मूळ गाव वाडा शहरापासून ९ किमी अंतरावर असलेले पिक हे खेडेगाव आहे. त्यांचे वास्तव्य मशाल हाऊस मध्ये असून ते सर्वांना सहज भेटतात. रोज सकाळी ९.३० वाजता ते यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील मशाल कार्यालयात बसतात. रोज संध्याकाळी ७ वाजता ते शरद नगरमध्ये फेरफटका मारून गृहप्रकल्पावर स्वतः जातीने लक्ष ठेवून असतात.

त्यांचा जन्म ८ मे १९७१ रोजी झाला असून ते पदवीधर आहेत. गेली ३८ वर्षे ते मशाल या वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यरत असून विविध विषयांवर जवळपास १६० पेक्षा जास्त पुस्तके व ५००० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. ते उत्तम व्याख्यातेही आहेत — महाराष्ट्रसह मलेशिया, मॉरिशियस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, थायलंड व दुबई या देशांमध्येही त्यांची व्याख्याने झाली आहेत. सुषवी ॲग्रो द्वारे शेती उद्योग व शिवक्रांती संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवतात. पत्रकारिता, उद्योजक, शेतकरी व लेखक म्हणून त्याना १०० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.